*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड बसस्थानकात नशामुक्ती आणि साथीच्या आजारसंदर्भात माहिती कक्ष*
*शिरगांव ः संतोष साळसकर*
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई नशा मुक्त भारत अभियानांतर्गत आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागातंर्गतआयुष्यमान आरोग्य मंदिर ईळये यांच्या सहकार्याने देवगड बसस्थानकात गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या कोकणवासीयांना साथीच्या आजारांबाबत तसेच व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी दिनांक २३ऑगष्ट २०२५ पासून सप्ताहभर व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन व विविध साथीच्या आजारांवर उपचार , माहिती देण्यासाठी कक्ष उभारण्यात आला आहे.
अलिकडे उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यसने करण्याचे प्रमाण वाढले आहे. उत्सव आनंदाने साजरा करायचे असेल तर आजारमुक्त व्यसनमुक्त राहून साजरे करावेत म्हणजे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. यासाठी येणाऱ्यां प्रवाशांनी साथीचे आजार आणि व्यसनाधीनता टाळण्यासाठी कक्षाशी संपर्क साधून माहिती घ्यावी असे कक्षाच्यावतीने आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ.अर्चना मार्गे, डॉ प्रितेश साळवी , श्री.एस पी. म्हाडदळकर,, श्री. ए. एम. डामसो, एस टी. घागरे, व्ही. बी. आणावकर सहभागी झाले होते. अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी दिली.