*कोंकण एक्सप्रेस*
*रामेश्वर मंदिरातील वरदशंकरव्रत पूजेंची सांगता*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या श्री वरदशंकर व्रतपूजेची सांगता आज श्रावण अमावास्येदिवशी करण्यात आली. या सांगते निमित्त मंदिरात श्रीवरदविनायक, श्रीवरदशंकर, श्रीसत्यनारायण, श्रीसत्यअंबा आणि श्रीसत्यदत्त यांची तर श्रींच्या गाभा-यात जाईच्या फुलांची पूजा बांधण्यात आली.
वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात वरदशंकरव्रत पूजेचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी श्रावण सोमवार आणि श्रावण गुरूवार यादिवशी भाविकांनी वरदशंकर पूजा बांधून भाविकांनी ग्रामदेवतेचरणी आपली सेवा केली. या पूजेंची सांगता शनिवारी अमावास्येदिवशी करण्यात आली. यानिमित्त श्रीवरदविनायक, श्रीवरदशंकर, श्रीसत्यनारायण, श्रीसत्यअंबा आणि श्रीसत्यदत्त यांची तसेच श्रींच्या गाभा-यात जाईंच्या फुलांची पुजा बांधण्यात आली.
फोटोओळी – वरदशंकर पूजेंच्या सांगतेनिमित्त मंदिरात श्रीवरदविनायक, श्रीवरदशंकर, श्रीसत्यनारायण, श्रीसत्यअंबा आणि श्रीसत्यदत्त यांची तर श्रींच्या गाभा-यात जाईच्या फुलांची पूजा बांधण्यात आली.