*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्र्यांचे अभिनंदन….. मग मटका जुगार कोणाच्या आशिर्वादाने चालताहेत??*
*मनसे तालुका अध्यक्ष शांताराम सादये*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई होताना दिसून येत आहे.सगळ्यात आधी मटका अड्ड्यावर जाऊन कारवाई केल्याबद्दल पालकमंत्री श्री नितेशजी राणे यांचे आभार मानतो. कारण नितेश राणे यांनी पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार अशी आरोळी ठोकली होती. परंतु त्याला पोलीस प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आज स्वतः पालकमंत्र्याना जाऊन कारवाई करावी लागली ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.सध्या सत्ताधारी लोकप्रतिधीनीना अश्या गोष्टी कराव्या लागत अस्ताईल तर मग सामान्य जनतेचे काय ??पालकमंत्री सत्ताधारी गृहमंत्री ह्यांच्याच पक्षाचे मग हे अपयश नक्की कोणाचे पालकमंत्र्यांचे की गृहमंत्र्यांचे???कणकवली तालुक्यात मटका जुगारासारखे अनेक अनैतिक धंदे राज रोस खुलेआम चालू असल्याचे दिसून येत आहेत तरी दिनांक १७-०६-२०२५ रोजी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली यांच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशन कणकवली यांना पत्र देऊन मागणी केलेली होती तरी कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नव्हती म्हणून त्याची पाठपुरवठा ही मनसे शिष्ट मंडळाकडून करण्यात आली होती तरी पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नव्हती यात कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे किंवा प्रशासनावर सरकारचा कसल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही असे दिसते निदान आता तरी पोलीस प्रशासन लक्ष घालून कारवाई करेल काय??? पोलिसांचे जर डोळे बंद असतील तर आम्ही आपल्याला अवैध असलेले धंदे याची माहिती देतो.मग रस्त्यावर उतरून कारवाई करायला तयार रहा. लवकरच या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट मनसे शिष्टमंडळ घेईल.