*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली बाजारपेठेत मुख्य जुगार मटक्यावर मंत्री नितेश राणे यांनी टाकली धाड*
*अवैद्य धंदे चालू देणार नाही, नितेश राणेंचा इशारा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्य बाजारपेठेत राज रोज चालणारा मटका जुगार आणि जिल्ह्यातील मुख्य मटका या ठिकाणी घेवारांच्या बंगल्यावर मुख्य जुगार मटक्यावर खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः तिथे जाऊन धाड टाकली. अकरा संशयित ताब्यात मिळाले असून अचानक केलेल्या कारवाईमुळे सर्व यंत्रण हादरली आहे या 11 संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .एक लाखापेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली आहे.जिल्ह्यात मटका जुगार चालू देणार नाही, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.