*कोंकण एक्सप्रेस*
*एस.एम.प्रशालेत संस्कृत दिन उत्साहात संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील एस.एम. हायस्कूल कणकवली या प्रशालेत सोमवार दि.18/08/2025 रोजी संस्कृत दिन उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन ,सरस्वती पूजन व कालिदास प्रतिमा पूजनाने झाली. वंदनीय कै .सदानंद पारकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणवकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी . एम.नलावडे होते. या वेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जी . एन.बोडके, संस्कृत अध्यापिका एस . सी.गरगटे व संस्कृत विभाग प्रमुख एस.एस.वायंगणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला एस. सी. गरगटे यांनी प्रास्ताविकासामध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले.विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्कृत गाणी ,संवाद कथा,नृत्य संस्कृत भाषेचे महत्व इत्यादी विषयक अनेक कार्यक्रम सुंदर रित्या सादर केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन.बोडके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्था सचिव डी. एम. नलावडे यांनी संस्कृत भाषेचे महत्व सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी तन्वी जाधव आणि वैदेही प्रधान यांनी केले तर आभार संस्कृत विभाग प्रमुख एस. एस. वायंगणकर यांनी मानले.