*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी १२.५० लाख रु. निधी मंजूर*
*माजी सभापती मनोज रावराणे यांचा यशस्वी पाठपुरावा*
जिल्हा वार्षिक योजना ग्रामपंचायतीना जनसुविधासाठी विषेश अनुदान या योजनेअंतर्गत नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या प्रयत्नातून, माजी सभापती मनोज रावराणे यांच्या पाठपुरावठ्यातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी १२.५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.
नवीन कुर्ली गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाल्यापासून गेली दोन वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या एक वर्ग खोलीतून सुरु होता. सदरच्या बाबीची दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात १२.५० लाख रू. निधी मंजूर करून दिला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.