*कोंकण एक्सप्रेस*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका अध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची फेर निवड*
मंगेश चव्हाण यांनी संघटनेमध्ये उत्कृष्ट काम गेली तीन वर्ष करत आहेत. आणि या कामाची पोचपावती म्हणून तालुकाध्यक्षपदी त्यांची फेरनिवार करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, राज्यनिरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी कणकवली तालुकाध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली.
मंगेश चव्हाण जिल्ह्यामध्ये स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये त्यांच्या नऊ शाखा कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. कणकवली तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन. व पुढील वाटचालीस शुभेच्छा.