*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे –
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश निवासस्थान, जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी १२.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून एअर इंडिया विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०१.२५ वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व बैठकीस उपस्थिती ( ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ), सायं. ०५.०० वा. भारतीय जनता पक्ष ओरोस कार्यालय, जि. सिंधुदुर्ग येथे पदाधिकाऱ्यांसह बैठकीस उपस्थिती ( ठिकाण : भारतीय जनता पक्ष कार्यालय, ओरोस ) असा त्यांचा दौरा असणार आहे.