*कोंकण एक्सप्रेस*
*राऊत विद्यालयातर्फे आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयातर्फे विद्यार्थी, पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी १९ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणी शिबिराचा ३०० रूग्णांनी लाभ घेतला. तर २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आरोग्य तपासणीत स्त्रीयांचे आजार, डोळ्यांचे आजार, ईसीजी, रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणीसह अन्य आजारांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. दोन्ही शिबिरे यशस्वी होण्यासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,शाखा-वेंगुर्ला व मातोश्री पार्वती राऊत विद्यालय-रेडी, राजाराम चिपकर, भूषण मांजरेकर, माऊली युवा प्रतिष्ठानचे सदस्य रोहन सावंत, प्रदीप बागायतकर, दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण तेंडुलकर, ज्ञानेश्वर राणे, संकल्प वाडकर, एसएसपीएम रूग्णालय आणि ब्लडबँक, मनिष यादव, विष्णू गोसावी, डॉक्टर, परिचारिका यांनी विषेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका गीता विल्सन यांनी सर्वांचे आभार मानले.