ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश दूर नाही ः आमदार दीपक केसरकर

ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश दूर नाही ः आमदार दीपक केसरकर

*कोंकण एक्सप्रेस*

*ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश दूर नाही ः आमदार दीपक केसरकर*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

ध्येय ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास यश दूर नाही. शिक्षण घेत असताना कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी सांगावे. पक्षाच्यावतीने त्या अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखविण्याचा आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात शिदेसेनेतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील सन २०२५ मधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. यात प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, माजी शालेय शिक्षण सभापती दादा कुबल, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, सुहास कोळसुलकर, योगेश तेली, अॅड.श्रध्दा बाविस्कर, परीक्षित मांजरेकर, शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचनाने माणूस मोठा होतो. जो वाचत नाही तो मोठा होऊ शकत नाही असे संजू परब यांनी स्पष्ट केले. तर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी मुलांना कष्टाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकापमुख नितीन मांजरेकर यांनी करताना उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सचिन परूळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!