*कोंकण एक्सप्रेस*
*दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे : आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा*
*सिंधुदुर्ग (तळेरे)*
असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्या निमित्त विविध उपक्रम आणि सण साजरे करण्यात आले. यामध्ये सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आजी आजोबांच्या दाताची काळजी घेण्यासाठी फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन करून त्यांच्या दातांची तपासणी रूट कॅनल, दात काढणे, दात साफ करणे, सिमेंट भरणे या गोष्टी केल्या गेल्या. याशिवाय, डॉ किसन गारगोटे व त्यांचे पुत्र डॉ. कृतेश गारगोटे व दिविजा वृद्धाश्रम यांच्या संयुक्तविद्यामाने न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट विद्यार्थ्यांची दातांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. त्यातील विद्यार्थ्यांचे रूट कॅनल, दात काढणे, दातांचे एक्सरे काढले. या शिबिरात जवळ जवळ २०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच कोळोशी ग्रामपंचायत येथे फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन गेले गेले. त्यातही जवळ जवळ १०० ग्रामस्थांनी सहभाग घेतला व आपल्या दातांचे उपचार करून घेतले.
वैद्यकीय उपचार घेत असताना श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौरीचा कार्यक्रमही दिविजा वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. आश्रमातील महिला कर्मचारी यांनी मंगळागौरीचा खेळ खेळून पारंपारिक गीते गाऊन त्यावर नृत्य करून आजी आजोबांना मंत्रमुग्ध केले.
नारळी पौर्णिमेचा सन दिविजा वृद्धाश्रमात अगदी थाटामाटात करण्यात आला. श्री सरस्वती नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांनी आजोबांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. त्याचबरोबर आश्रमातील आजींनीही थरथरनाऱ्या हातांनी ओवाळणी करून आपल्या नवीन तयार झालेल्या भावांना राखी बांधली. आजोबांनीही या क्षणी डोळ्यातून आनंदाश्रू काढून आपल्या लाडक्या बहिणींना कॅटबरी दिली. आजी आजोबांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने आश्रमात नारळीभात व नेवऱ्या या भोजनाचा स्वाद घेतला. खूप वर्षांनी असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मेनू सकट साजरा केला असे उदगार आजी आजोबांनी काढले.
या वृद्धाश्रमात १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला. आश्रमातील सिनियर कर्मचारी श्रीम भारती गुरव यांनी ध्वजारोहण केले. या आश्रमातील कर्मचार्यांनी अगदी थाटामाटात दहीहंडी बांधली व कृष्ण जन्म साजरा केला. गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात आश्रम दुमदुमला. आश्रमातील सर्व आजी आजोबांनी दहीहंडी आनंदात व उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला. आश्रमातील आजी श्रीम कमल तांबे (वय वर्ष ८०) यांनी दहीहंडी फोडली. सर्व आजी आजोबांनी आपल्या वयाचा विचार न करता दहीहंडीचा कार्यक्रम पार पाडला.
या आश्रमातील आजी आजोबांची मोफत रुग्ण सेवा करणारे आश्रमचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनीही आपली पत्नी डॉ हेमा विद्याधर तायशेटे यांच्या वाढदिवस निमित दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांना एक दिवसाची वैद्यकीय सेवा शिबीर मोफत आयोजित केला. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने डॉ हेमा विद्याधर तायशेटे यांनी आपला वाढदिवस दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला. दरवर्षी तायशेटे कुटुंबीय वेगेवगळ्या प्रकारे आपला वाढदिवस आश्रमात साजरा करत असतात.
तसेच डॉ विद्याधर तायशेटे यांनी संजीवनी हॉस्पिटल ला २२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व आजी आजोबांचा मोफत रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. श्रावण महिन्याचे औचित्य साधून आश्रमातील महिला कर्मचारी यांनी एक दिवस महिला भजनाचा कार्यक्रम सादर केला. आश्रमातील कर्मचारी श्रीम भारती गुरव या भजनी मंडळाचा बुवा आहे. ढोल व झांजांच्या तालावर आश्रमात पुंडलिकवरदे हार विठ्ठल नामाचा गजर झाला व भजनाची सुरुवात झाली. श्रीम भारती बुवांना आश्रमातील सर्व महिला कर्मचार्यांनी भजनाला साथ दिली. भक्तिमय वातावरणात भजनाला सुरुवात झाली. तर आश्रमातील मॅनेजर श्री समीर यांनी भजनाचा ठेका घेऊन त्यात आणखी रंगत भरली. आश्रमातील सर्व कर्मचाऱ्याकडून हा भजनाचा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पाडला.असे विविध उपक्रम दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे मानसिक आरोग्य सुरळीत राहावे व घरापासून लांब असूनही त्यांना आनंदलुटता यावा यासाठी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांनी केले.