*कोंकण एक्सप्रेस*
*रोटरीतर्फे निक्षयमित्र कार्यक्रम संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यातर्फे १२ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय येथे प्रधानमंत्री टीबी भारत मुक्त अभियान अंतर्गत निक्षय मित्र कार्यक्रम घेण्यात आला. यात रोटरीच्या सदस्यांकडून वेंगुर्ला तालुक्यातील एकूण बारा टीबी रूग्णांना पौष्टिक आहार फूड बास्केटतसेच तालुक्यातील २६ कुपोषित मुलांना प्रोटीन पावडर व प्रोटीनयुक्त औषधे देण्यात आली.
या उपक्रमासाठी रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे, संजय पुनाळेकर, राजन गिरप, दिपक ठाकूर, दिलीप शितोळे, किरण कुबल, आनंद बांदेकर, धनेश आंदुर्लेकर, सुनिल रेडकर, शंकर वजराटकर, डॉ.वसंतराव पाटोळे आदींनी सहकार्य केले. टीबी रूग्णांना
रूग्णांना पुढील सहा महिन्यांसाठी पौष्टिक आहार फूड तर कुपोषित मुलांना प्रोटीन पावडर व प्रोटीनयुक्त औषधे देण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरीतर्फे देण्यात आली. याप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रीक सेक्रेटरी राजेश घाटवळ, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदिप सावंत, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे जिल्हा समन्वयक सुरेश मोरजकर, आरोग्य पर्यवेक्षक रमेश परब, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सखाराम वराडकर, आरोग्य सहाय्यक विजय आंबेरकर, आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.अश्विनी माईणकर, अंगणवाडीच्या मुख्यसेविका श्रीमती सामंत, रूग्णालयाच्या सिस्टर श्रीमती डिसोझा, श्रीमती घाटवळ यांच्यासह कर्मचारी तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष अपर्णा बोवलेकर व सदस्य आरती गिरप उपस्थित होत्या.
