*कोंकण एक्सप्रेस*
*एस् एम् .हायस्कूलमध्ये पसायदानाचे सामूहिक गायन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज गुरुवार दिनांक 14 आॅगस्ट 2025 रोजी एस् एम् प्रशालेत विद्यार्थ्यांनी पसायदानाचे सामूहिक गायन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव मा. नलावडे साहेब उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक मा. श्री. बोडके सर, उप मुख्याध्यापक श्री. प्रधान सर, पर्यवेक्षक श्री. कदम सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्वांनी अत्यंत सुरेल आवाजात पसायदान म्हटले. यावेळी हार्मोनियम ची साथ प्रशालेचे कलाशिक्षक श्री. बोरचाटे सर यांनी केली. श्री. हिर्लेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गरगटे मॅडम यांनी केले.
यावेळी श्रीम. वायंगणकर मॅडम, श्री. जगदाळे सर, श्री. हाके सर उपस्थित होते