*कोंकण एक्सप्रेस*
*दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप‘चे वितरण*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनतर्फे येथील पाटकर हायस्कूलमधील दहावीच्या मुलांना आयडियल स्टडी अॅपचे वितरण करण्यात आले. रोटरी सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे यांनी दहावीच्या मुलांना आयडियल स्टडी अॅपचा कशाप्रकारे फायदा होणार आहे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर डॉ.प्रशांत कोलते, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरीचे डिस्ट्रीक सेक्रेटरी राजेश घाटवळ, वेंगुर्ला अध्यक्ष आनंद बोवलेकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष अपर्णा बोवलेकर व सदस्य आरती गिरप, हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत धुरी, शिक्षक महेश बोवलेकर, विलास गोसावी यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.