*कोंकण एक्सप्रेस*
*बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार*
*⭕बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगा*
*⭕मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक*
*⭕IMA व अस्तित्व परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद”
*⭕जिल्ह्यात आभार व सत्कार सोहळा*
*⭕लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक*
*सिंधुदुर्ग :*
बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन विषयावर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, संबंधित संचालक, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेतला. यानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.
यावेळी IMA आणि अस्तित्व परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांचे मते ऐकून घेत, छोट्या नर्सिंग होम्स टिकून राहाव्यात आणि आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी सकारात्मक चर्चा पार पडली.
याबाबत आनंद व्यक्त करत आज जिल्ह्यातील IMA पदाधिकारी व अस्तित्व संघटनेने पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा आभार व सत्कार सोहळा आयोजित केला.
या कार्यक्रमास डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. धीरज सावंत, डॉ. संजय सावंत, डॉ. संजय केसरे, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. शमीता बिरमोळे, डॉ. सूर्यकांत ताय शेट्ये, डॉ. संदीप सावंत, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ. रिचा कुलकर्णी, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, डॉ. धनंजय रासम, डॉ. समीर नवरे, डॉ. धनेश म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांच्याशीही चर्चा करण्यात आली . तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे , खासदार नारायण राणे यांच्यासह , मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.