माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला*.

*या स्वातंत्र्य दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष,क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबई) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन, करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्य गीत, संविधान प्रतिज्ञा, जेष्ठ नागरिक प्रतिज्ञा घेण्यात आली. माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते सादरीकरण केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सन्मा. सतीश सावंत यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट कवायती सादर केल्या. सरते शेवटी प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व वर्गशिक्षक यांनी तिरंगा विथ सेल्फी फोटो काढण्यात आले.*

*सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन मा.श्री.आर.एच.सावंत, शालेय समिती सदस्य मा.श्री. गणपत सावंत, मा.श्री. चंद्रशेखर वाळके, मा.श्री. संतोष सावंत, मा.श्री. बावतीस घोन्सालवीस, मा. श्री. मंगेश सावंत, प्रशालेची माजी विद्यार्थ्यानी फ्लोरा लोबो, सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती सदस्य व आदी मान्यवर, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्री. प्रसाद मसुरकर यांनी केले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!