*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण*
*सिंधुदुर्ग*
स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिल्या जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील ३ जणांना, सावंतवाडी तालुक्यातील २ जणांना तर वैभववाडी, वेंगुर्ला, कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ९ पात्र नवीन तसेच मृत पररवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात आले. हे परवाने वितरण शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभानंतर पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडले.