*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ल्यात ‘ऑपरेशन सिदूर‘ पदयात्रा उत्साहात*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
भारतीय जनता पार्टीच्यावतीने वेंगुर्ल्यात ‘ऑपरेशन सिदूर‘ पदयात्रा उत्साहात पार पडली. ‘हर घर तिरंगा‘ अभियानाचे औचित्य साधत या रॅलीने वेंगुर्ला शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
प्रारंभी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी समारंभात जिल्ह्यातील निवृत्त सैनिकांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. गोस्वामी यांच्या हस्ते पदयात्रेचा शुभारंभ करून शहरातून पदयात्र काढण्यात आली. निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा हातात घेत एनसीसी कॅडेट्स, शिक्षक, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेत घोषणा, देशभक्तपर गीते आणि ‘हर घर तिरंगा‘चे संदेश देण्यात आले. ही पदयात्रा तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
या पदयात्रेत उद्योजक सुधिर झांटये, डॉ.सचिन परूळकर, भाजपाचे शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, विष्णू परब, साईप्रसाद नाईक, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, वसंत तांडेल, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुरेंद्र चव्हाण, सुजाता पडवळ, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, नामदेव सरमळकर, मनवेल फर्नांडीस, प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, पिटू सावंत, संतोष सावंत, प्रमोद वेर्णेकर, नागेश वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – वेंगुर्ला येथे ‘ऑपरेशन सिदूर‘ पदयात्रा काढण्यात आली.