*कोंकण एक्सप्रेस*
*योग कल्याणकर, लक्षण नांदगावकर, आराध्या ब्रम्हदंडे यांचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश*
*कासार्डे प्रतिनिधी; संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वाराआयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचा ९ वी चा खेळाडू योग कल्याणकर याने १७ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात कणकवली तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटात कासार्डे ज्यु. कॉलेजचा लक्षण नांदगावकर १२ वी विज्ञान याने चौथा क्रमांक पटकावला आहे.याच वयोगटात
मुलींमध्ये आराध्या ब्रम्हदंडे १२ वी विज्ञान हिनेही मुलींच्या गटातून पाचवा क्रमांक पटकावला आहे.
कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे पार पडली. या यशस्वी तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना प्रा.
विनायक पाताडे, नवनाथ कानकेकर, अनंत काणेकर, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा.अनिलकुमार जमदाडे,प्रा. दिवाकर पवार व क्रीडा विभागातील इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबई अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी पालक शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.