*कोंकण एक्सप्रेस*
*समुहगीत गायन स्पर्धेत वजराट नं.१ आणि आसोली हायस्कूल प्रथम*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
भाजपा सिधुदुर्गतर्फे १४ ऑगस्टला घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात वजराठ शाळा नं.१ ने तर माध्यमिक गटात आसोली हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.
वेंगुर्ला हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजिका सीमा नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू परब, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, ज्येष्ठ नागरीक संघाचे एस.एस.काळे, मुख्याध्यापक सचिन बिडकर, माजी मुख्याध्यापक प्रमोद कांबळे, कोकण कला आणि शिक्षण संस्थेचे प्रथमेश सावंत, वसंत तांडेल, नामदेव सरमळकर, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, आसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक भावना आवळे-धुरी, संजय परब, एकनाथ जानकर, कर्पुरगार जाधव, अणूसर पाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम-वजराठ नं.१, द्वितीय-वेंगुर्ला नं.४, तृतीय-आडेली नं.१, उत्तेजनार्थ-वेतोरे नं.१ व वेंगुर्ला नं.१ यांनी तर माध्यमिक गटात प्रथम-आसोली हायस्कूल, द्वितीय-श्री शिवाजी हास्कूल-तुळस, तृतीय अणसूर पाल हायस्कूल, उत्तेजनार्थ- सातेरी हायस्कूल वेतोरे आणि दाभोली इंग्लिश स्कूल यांनी पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण रूपेंद्र परब आणि अमृता पेडणेकर यांनी केले. विजेत्यांना संघांना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परूळकर यांनी केले.