*कोंकण एक्स्प्रेस*
*शिवाजी प्रागतिकच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न/*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १३ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या शालेय आठवणींना उजाळा देत शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
या मेळाव्याला जयराम वायंगणकर, देविदास आरोलकर, भरत परब, प्रसाद मराठे, नेहाल शेख, मैनुद्दीन धारवाडकर, राहूल कांबळे, सुशिल घाडी, संतोष जगताप, दिपमाला जाधव आदी माजी विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने पोफळी वृक्षाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. तर शाळेच्या विकासासाठी सदैव सहकार्य करू असे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाला दिले.