*कोंकण एक्सप्रेस*
*बांधकाम उपविभाग दोडामार्ग कार्यालयाचे १५ ऑगस्टला सर्वसामान्यांसाठी लोकार्पण करणार : रविकिरण गवस*
*दोडामार्ग : शुभम गवस*
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय दोडामार्ग या इमारतीचा नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा 15 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करणार असल्याचे प्रतिपादन तथा गंभीर इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष युवानेतृत्व रविकिरण गवस यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालय, दोडामार्ग येथे दिला आहे.
दोडामार्ग तालुका हा तळ कोकणातील शेवटचे टोक असलेला तालुका असून ग्रामीण भागातील डोंगराळ तालुक्यामध्ये गेले चार महिने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाची इमारत बांधून पूर्ण झालेली आहे. मात्र सत्ताधारी पक्षा तर्फे लोकार्पण सोहळा होण्यासाठी तारीख पे तारीख सुरू आहे. तब्बल बांधकाम विभागाने तीन वेळा लोकार्पण सोहळा होणार म्हणून साफसफाई व पूर्वतयारी केली. मात्र अद्यापही ही इमारत लोकार्पण न झाल्या कारणाने लोकसेवेत सुरू झाली नाही आहे. जनसामान्यांचा निधी या इमारतीसाठी खर्च झाला असून जन सामान्यांसाठी, जनसामान्यांच्या सेवेसाठी आणि जनसामान्यांच्या हस्ते स्वतंत्र दिनी 15 ऑगस्टला या इमारतीत पाऊल ठेवून सार्वजनिक बांधकाम विभागच्या या इमारतीत जणू काही आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ह्या जनसामान्यांच्या इच्छेने या इमारतीचा 15 ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळा ठीक बारा वाजता होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यात दोडामार्ग तालुक्यातील जनसामान्य नागरिकांनी, महिला भगिनींनी, युवतींनी, सामाजिक बांधिलकी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, समाजातील सर्व घटकांनी, सर्व पक्षीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी केले आहे.
रविकिरण गवस यांनी पुण्यासारख्या शहरात पक्षाध्यक्ष शरद पवार, संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले आठ वर्ष पुणे येथे कार्यरत असल्याकारणाने जनसामान्यांना न्याय कसा द्यावा याची उत्तम जाण, प्रशासनावर पकड असलेला एक युवा नेतृत्व म्हणून रविकिरण गवस उदयाला येत असून जनसामान्यांच्या सेवेसाठी साठी आपण सर्वतोपरी आपले योगदान देणार असून त्यासाठी वाट्टेल ते तालुक्याच्या विकासासाठी करण्यासाठी आपली धडपड आहे. आणि म्हणूनच या इमारतीचा लोकार्पण सोहळा हा जनसामान्यांच्या सेवेसाठी आपण करत आहे. यासाठी प्रत्यक्ष बुधवारी या इमारतीचा त्यांनी आढावा घेतला. प्रत्यक्ष पूर्ण इमारतीचा बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांसहीत पाहणी केली. इमारत सुस्थितीत आहे हे त्यांनी पाहिले. मग वेळ का? हा खडा सवाल उपस्थित करत तारीख पे तारीख चालणार नाही. तर जनसेवेसाठी लोकार्पण करणारच असा गंभीर इशारा रविकिरण गवस यांनी दिला आहे.