भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या नारळ लढविणे स्पर्धेत सुचिता केळूसकर व रेगन नरोना विजयी

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या नारळ लढविणे स्पर्धेत सुचिता केळूसकर व रेगन नरोना विजयी

*कोंकण एक्स्प्रेस*

*भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या नारळ लढविणे स्पर्धेत सुचिता केळूसकर व रेगन नरोना विजयी*

*मालवण : प्रतिनिधी*

नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी, मालवण मुंबई संचलित भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित आणि माजी विद्यार्थी अनंत पाटकर व फ्रान्सिस नरोन्हा पुरस्कृत आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आजी माजी विद्यार्थिनींच्या गटात सुचिता केळूसकर विजेती तर आजी माजी विद्यार्थ्यांच्या गटात रेगन नरोना विजयी ठरला.

या स्पर्धेत ४२ मुली व ९० मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थिनी व उद्योजिका सौ. संगीता ओरसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्पर्धेत आजी माजी विद्यार्थिनींच्या गटात मृणाली गोसावी हिने द्वितीय, शौर्या कांबळी हिने तृतीय व हिना धुरी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. आजी माजी विद्यार्थ्यांच्या गटात शरपुद्दीन अथनीकर याने द्वितीय क्रमांक, आकाश तळगावकर याने तृतीय क्रमांक आणि तनय माणगावकर व स्वीटन भुतेलो यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!