मालवणात निघाली तिरंगा रॅली; देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदूमला

मालवणात निघाली तिरंगा रॅली; देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदूमला

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवणात निघाली तिरंगा रॅली; देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदूमला*

*मालवण ः प्रतिनिधी*

अखंड भारताचे स्मरण व भारतीय स्वातंत्र्य दिनाचे स्वागत या अनुषंगाने आज मालवणात देशप्रेमी नागरिकांच्या सहभागातून मोटरसायकलद्वारे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. राष्ट्रध्वज फडकवत भारत माता की जय… वंदे मातरम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अखंड भारत… समर्थ भारत अशा घोषणा यावेळी नागरिकांनी देत आसमंत दणाणून सोडला.

मालवण भरड नाका येथून सुरु झालेली ही तिरंगा रॅली बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार ते पुन्हा भरड नाका येथून देऊळवाडा मार्गे कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकापर्यंत काढण्यात आली. यावेळी देश स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना व देशाच्या फाळणीवेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, लायन्स क्लब अशा विविध संघटननांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना विलास हडकर म्हणाले, १४ ऑगस्ट हा देशाच्या फाळणीच्या शोकांतिकेचा काळा दिवस आहे. तोडा फोडा राज्य करा या विचाराने आपल्यावर राज्य केलेले इंग्रज जाताना देखील देशाची फाळणी करून गेले. यामध्ये अनेक नागरिक व स्त्रिया यांच्यावर अत्याचार झाले. हे आपण विसरता कामा नये. भुतान, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार अशा अनेक भुभागांनी जोडलेल्या भारताचे तुकडे केले गेले. त्यामुळे अराजकीय व नैसर्गिकरित्या सुरक्षित असा अखंड भारत पुन्हा साकारणे हे आपले स्वप्न आणि निष्ठा आहे, यासाठी नागरिकांना संघटित करण्याच्या दृष्टीने तिरंगा रॅली महत्वाची आहे, असेही हडकर म्हणाले.

 

यावेळी अशोक सावंत, भाऊ सामंत, विलास हडकर, बाबा मोंडकर, राजन वराडकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, मंदार केणी, आबा हडकर, भालचंद्र राऊत, महेश सारंग, परशुराम पाटकर, बबन परुळेकर, सन्मेष परब, आप्पा लुडबे, अनिकेत फाटक, ललित चव्हाण, श्रीराज बादेकर, भाई कासवकर, मनोज मेथर, संदीप बोडवे, मिलिंद झाड, महेश मेस्त्री, दादा वाघ, जीवन भोगावकर, राजू आंबेरकर, गणेश चव्हाण, रवींद्र खानविलकर, यतीन मालवणकर, हरेश फडते, शाम झाड, मोहन कुबल, सुशांत तायशेटे, रत्नाकर कोळंबकर, राजू बिडये, मंदार झाड, पंकज पेडणेकर, पूजा करलकर, वैष्णवी मोंडकर, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, शुभदा टीकम, अनुष्का चव्हाण, पूनम चव्हाण, नंदिनी गांवकर आदी व इतर सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!