*कोंकण एक्सप्रेस*
*कु.श्रावणी राजेंद्र मराठे या विद्यार्थ्यानीच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण*
*श्रावणी मराठे बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम*
*कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांनी दिला बहुमान*
‘ हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येत आहे. आज कलमठ ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहणाचा मान सरपंच संदिप मेस्त्री यांनी बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम आलेल्या कु श्रावणी राजेंद्र मराठे या विद्यार्थिनीला दिला, आणि ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, पपू यादव, श्रेयस चिंदरकर,सचिन खोचरे, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, ज्योत्स्ना मराठे, विद्या लोकरे,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ उपस्थित होते.