*कोंकण एक्स्प्रेस “
*मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले पर्यावरण संवर्धनासाठी ‘वृक्ष रक्षाबंधन*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून प्रशालेसमोर ‘वृक्ष रक्षाबंधन ‘हा अभिनव उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षाला राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला
जशी बहिण भावाला राखी बांधून त्यांच्याकडून रक्षणाची हमी घेते तशीच झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भंडारी हायस्कूल या प्रशालेच्या मुलांनी घेतली. वृक्षतोड थांबवणे, हिरवाई वाढवणे, समाजामध्ये झाडांचे महत्त्व पटवून देणे, झाडांना सजीव मानून त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपणे असे पर्यावरणाचे संदेश पसरवणे व यांची समाजात व मुलांमध्ये जाणीव जागृती हा उद्देश या उपक्रमांमध्ये होता.
यावेळी मुलांनी स्वतः निसर्गातीलच सर्व साहित्य वापरून स्वतः आकर्षक राख्या बनवून झाडांना बांधून झाडांचे आम्ही रक्षण करू अशी शपथ घेतली. यावेळी मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे, सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे, आय बी टी विभागाच्या केशव भोगले, जगन्नाथ आंगणे,सौ नेहा गवंडे, दर्शना मयेकर आदी उपस्थित होते