वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळातर्फे गुणवंतांचा सत्‍कार

वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळातर्फे गुणवंतांचा सत्‍कार

*कोंकण एक्सप्रेस*

*वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळातर्फे गुणवंतांचा सत्‍कार*

*पहिल्‍या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम : शाळा क्र.१ मध्ये शालेय साहित्‍य वितरण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्‍यातील वरवडे येथील कोष्‍टीवाडी मित्रमंडळाचा पहिला वर्धापन दिन नुकताच उत्‍साहात साजरा झाला. यात कोष्‍टीवाडीतील २२ ज्येष्‍ठ नागरिकांचा तर वरवडे गावातील ४२ गुणवंतांचा सत्‍कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. याखेरीज वरवडे शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्‍याचे वितरण करण्यात आले.
कोष्‍टीवाडीतील तुषार बुचडे यांच्या निवास्थानी झालेल्‍या या कार्यक्रमात ज्‍येष्‍ठ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्‍वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर होते. तसेच उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, सहसचिव तेजस पोयेकर, खजिनदार दर्शन पोयेकर यांच्यासह सुरेश पोयेकर, धनंजय सावंत, शरद पोयेकर, शरद लाड, तुषार बुचडे, प्रभाकर बुचडे, स्वप्नील सावंत, प्रशांत केळवलकर, नरेंद्र कांबळी, नागेश राणे, सुशांत सावंत, संतोष राणे, मिलिंद बुचडे, सुभाष सावंत, अक्षय पोयेकर, दीपक पोयेकर आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर आणि धनंजय सावंत यांनी वर्षभरात राबविण्यात आलेले रक्‍तदान शिबिर, स्वच्छता तसेच इतर उपक्रमांची माहिती दिली. शरद लाड यांनीही मनोगत व्यक्‍त केले.
यानंतर वाडीतील २२ ज्‍येष्‍ठ नागरिकांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तर दहावी, बारावी, पदवी, शिष्‍यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा ज्‍येष्‍ठ नागरिकांच्याहस्ते तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यानंतर वरवडे शाळा नं.१ येथील अंगणवाडी अाणि शाळांतील मुलांना शालेय साहित्‍याचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!