*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड*
*निवडीबाबत सर्व स्तरातून होत आहे कौतुक…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी योगेश (भाई) बेळणेकर यांची निवड करण्यात आली आहे.युवा उद्योजक,गावातील विविध उपक्रमामध्ये सहभाग,सढळ हस्ते मदत कार्य करणे,समाजात आगळीवेगळी ओळख शांत व संयमी हुशार व्यक्तिमत्व पेशानी सिव्हिल इंजिनिअर यापूर्वी वाडोस उपसरपंच पद भूषविले आहे.
त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.