*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी प्रशालेतर्फे तिरंगा रॅली*
*कणकवली वार्ताहर*
जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत रहाव्यात, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे या उद्देशाने ” हर घर तिरंगा ” या उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट २०२५ रोजी कनेडी बाजारपेठेत तिरंगा रॅली काढण्यात आली.
या रॅलीसाठी प्रशालेचे शिक्षक श्री.आर.एन.भानुसे, श्री. एस.एस.गुरव, श्री.बी.डी.कोरडे, श्रीमती एच.बी.पटेल व इयत्ता नववी ते अकरावीचे सर्व विद्यार्थी तसेच सांगवे गावचे सरपंच श्री. संजय सावंत, उपसरपंच श्री.अभिजीत काणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.राजेश सापळे, श्री.रमेश म्हापणकर,श्रीकृष्ण वाळके आदी सदस्य तसेच बाजार पेठेतील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.
सकाळी नऊ वाजता माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतून या फेरीला प्रारंभ झाला. तेथून कनेडी बाजारपेठ मार्गे बँक ऑफ इंडिया व सांगवे ग्रामपंचायत कार्यालय मार्गे कनेडी आणि त्यानंतर पुन्हा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचे संपूर्ण मार्गदर्शक व नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी व पर्यवेक्षक श्री.बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.