*कोंकण एक्सप्रेस हायवे*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी च्या स्काऊट गाईड युनिट कडून वृद्धाश्रम कर्मचारी बांधवांना रक्षाबंधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेच्या इयत्ता नववी ब च्या स्काऊट गाईड युनिटच्या विद्यार्थिनींनी वृद्धाश्रम कर्मचारी बांधवांना रक्षाबंधन करत नारळी पौर्णिमा साजरी केली तेथील कर्मचारी वृद्धांची आपल्या आई वडिलांप्रमाणे काळजी घेतात त्याची उतराई म्हणून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी च्या विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून केले या कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या आणि खाऊ वाटप देखील करण्यात आले. वृद्धाश्रम व्यवस्थापक सन्माननीय श्री मडव साहेब यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि व्यवस्थापनाकडून खाऊचे वाटप करण्यात आले त्यावेळी स्काऊट मास्टर श्री मेस्त्री सर व गाईड कॅप्टन श्रीमती हाटले मॅडम उपस्थित होत्या हा संपूर्ण कार्यक्रम सन्माननीय मुख्याध्यापक श्री दळवी सर व पर्यवेक्षक श्री बुरान सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला