‘भालचंद्र चषक २०२५’ कबड्डी स्पर्धेचा दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ ठरला मानकरी

‘भालचंद्र चषक २०२५’ कबड्डी स्पर्धेचा दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ ठरला मानकरी

*कोंकण एक्सप्रेस**

*’भालचंद्र चषक २०२५’ कबड्डी स्पर्धेचा दिर्बादेवी जामसंडे देवगड संघ ठरला मानकरी*

*यंगस्टार कणकवली संघ उपविजेता*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामना दिर्बादेवी जामसंडे देवगड विरुद्ध यंगस्टार कणकवली संघ यांच्यात झाला. यात दिर्बादेवी जामसंडे देवगड संघाने यंगस्टार कणकवली संघाचा पराभव करत भालचंद्र चषकावर नाव कोरले. स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भद्रकाली गुढीपुर संघाने पटकावले व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक गिरोबा सांगेली संघाने पटकावले. या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला. यामध्ये अष्टपैलू खेळाडू प्रथमेश पेडणेकर (यंगस्टार कणकवली), उत्कृष्ट चढाई सुशील पाटकर (दिर्बादेवी जामसंडे देवगड), उत्कृष्ट पकड सिद्धेश भडसाळे (दिर्बादेवी जामसंडे देवगड) यांना देण्यात आले. सर्व संघाना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले

यावेळी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी नगरसेवक अभय राणे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, चिटणीस अवधूत तळगावकर, अरुण जोगळे, अमिता राणे, चानी जाधव, परेश परब, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, भालचंद्र पेडणेकर, रूपेश केळुसकर, रुचिर ठाकूर, अभि चव्हाण, चिन्मय माणगावकर, संदेश आर्डेकर, नंदू वाळके, भैया आळवे, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, शिवलिंग पाटील, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, सुशांत सावंत, ओंकार हळदीवे, समीर कमलापुरे, रूपेश साळुंखे आदी मान्यवर व कबड्डी प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!