*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला शाळा नं.४ मध्ये रक्षाबंधन उत्साहात*
*वेंगुर्ला प्रतिनिधी(प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला सातेरी मंदिर नजिक असलेल्या वेंगुर्ला शाळा नं.४ मध्ये आज विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
या शाळेत वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जातात. यावर्षी रक्षाबंधनाचा सणही साजरा करण्यात आला. या राख्या विद्यार्थींनीनी स्वतः बनविल्या होत्या. प्रारंभी शिक्षक संतोष परब यांनी रक्षाबंधन सणाचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व विषद केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, मुख्याध्यापिका संध्या बेहेरे, शिक्षक सुनंदा खंडागळे, सुधर्म गिरप, सानिका कदम, नेहा परब तसेच पोषण आहाराच्या सौ. वेंगुर्लेकर व सहाय्यक मदतनीस सौ. परब उपस्थित होते.