*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील(NDRF) जवानांना बांधल्या राख्या*
*मालवण ः प्रतिनिधी*
९ ऑगस्ट क्रांती दिन व रक्षाबंधन याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थ्यांनी एनडीआरएफ च्या जवानांना राख्या बांधल्या .तसेच या दलाकडून आपत्ती निवारण संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी एनडीआरएफ दलाचे 15 जवान उपस्थित होते. रक्षाबंधन निमित्त प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून झाडांचे रक्षण करावे असा संदेश दिला. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. तसेच क्रांती दिनानिमित्त सर्व महात्मांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री . बाबा राव राणे सचिव. श्री .घन:श्याम राणे संचालक .श्री सुभाष सावंत व ग्रामस्थ; शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ;उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन आजचा क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आणि आजच्या या क्रांती दिना दिवशी उत्तम असे मार्गदर्शन जवानांकडून मिळाले. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चव्हाण सर यांनी केले व आभार सौ. देसाई मॅडम यांनी मांडले.