*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी साहिल अनिल साठे याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी साहिल अनिल साठे याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे.
भारतीय नौदलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन परीक्षेत घवघवीत यश मिळवत साहिलने हे यश प्राप्त केले आहे. तो आता भारतीय नौदलात ‘कमिशनंड ऑफिसर’ म्हणून देशाची सेवा करेल. साहिलने आपले पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. दहावीच्या परीक्षेत त्याने ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये अकरावी- बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पुणे येथील वाडिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (BE) पदवी संपादन केली.
साहिल हा मालवण येथे सागरी सुरक्षा दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल साठे आणि भरड येथील फॅशन गॅलरीच्या मालक शीतल साठे यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.