कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न*

कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न*

*मालवण ः प्रतिनिधी*

कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे यांच्या कडून या स्पर्धेचे तोंडभरून कौतुक करण्यात आले .यावेळी आमदार राणे यांनी सर्वात जुनी नारळ लढविणे स्पर्धा व सर्वात जास्त गर्दी असणारी स्पर्धा म्हणजे शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाची स्पर्धा आहे. शिवप्रेमी व हिंदुत्ववादी असलेल्या शिल्पा खोत यांच्या कडून आयोजित होणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर वाढत राहो, हिंदूंचे सण अशाच प्रकारे मोठ्या थाटात साजरे झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली महिलांसाठीच्या या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत लतिका लुडबे या विजेत्या ठरून त्यांनी सोन्या चांदीने मढवलेला मानाचा श्रीफळ चषक पटकाविला

नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आयोजित व स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, कोकण वाईल्ड रेस्क्युअर सिंधुदुर्ग, सेवते प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मालवण बंदर जेटी येथे आयोजित महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत लतिका लुडबे या विजेत्या ठरून त्यांनी सोन्या चांदीने मढवलेला मानाचा श्रीफळ चषक पटकाविला. तर हर्षदा पेंडूरकर या उपविजेत्या व दिपा पवार तृतीय विजेत्या ठरल्या. तसेच मौसमी मंदार जाधव यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. लहान मुलांच्या स्पर्धेत प्रशांत हरिश्चंद्र पेंडूरकर विजयी ठरला.

यावेळी आमदार निलेश राणे यांचा शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपचे अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहाराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, राजू परुळेकर, बबन शिंदे, विश्वास गांवकर आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धे दरम्यान स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे महाकाल या संकल्पनेवर ढोल वादन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या लतिका लुडबे यांना भाजपचे अशोक सावंत, भाई परुळेकर, मंदार केणी, भाई कासवकर, शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या हस्ते सोन्या चांदीने मढवलेला श्रीफळ चषक, सोन्याची नथ, सोन्याचे कॉईन व पैठणी देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या हर्षदा पेंडूरकर यांना महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, तारका चव्हाण, नमिता गावकर, सौ. प्रभाळे यांच्या हस्ते सोन्याची नथ व पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच
तृतीय विजेत्या दिपा पवार यांना करुणा जळवी व समस्त स्वराज्य, यशराज प्रेरणा, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, सौ. शिल्पा यतिन खोत यांच्या सोन्याची नथ व पैठणी देऊन गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ मौसमी जाधव यांना चांदीच्या भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत प्रशांत हरिश्चंद्र पेंडूरकर विजयी ठरला. तर स्वरा वसंत कांदळगावकर हिने द्वितीय व रोहन संतोष गोवेकर याने तृतीय मिळविला. या तिघांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शिल्पा खोत मित्रमंडळातर्फे पारंपरिक वादक लक्ष्मण मालवणकर, बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते पंकज गावडे, ब्लड बँक सिंधुदुर्गचे रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले व मालवणचे श्री नंदकुमार आडकर, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गचे ओमकार लाड, डॉ. प्रसाद धमक, श्री. चिऊळकर, सिद्धेश ठाकूर, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, दर्शन वेंगुर्लेकर तसेच व्यवसायिका सौ. अनिता आळवे यांचा सन्मान करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!