*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण पुरक राखीचे अनोखे प्रदर्शन व वृक्षसंवर्धन राखी बांधून साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत रालूखी बंधन सणाचे औचित्य साधून पर्यावरण विभागाने भव्य राखींचे प्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनात प्रशालेतील पाचवी ते नववीच्या विद्यार्थी – विद्यार्थींनीनी सहभाग घेतला होता . विविध रंगांच्या व आकारांच्या राख्या विद्यार्थांनी स्वतः कला कौशल्याने तयार करून सुंदर प्रदर्शन मांडले होते अल्प किंमतीत राख्या विक्रीसाठी सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या पर्यावरण व प्रदूषण यांचा विचार करून विद्यार्थांनी श्री प्रसाद राणे सरांच्या मार्गदर्शनाने तयार करून अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले या प्रदर्शनाचे उद्गाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी केले प्रदर्शनाची पहाणी करून विद्यार्थांचे कौतुक केले तसेच झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाला विद्यार्थांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली व पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न केला प्रशालेचे मुख्याधापक श्री पी जे कांबळे सरांनी राखी बंधन सणाचे महत्व व पर्यावरण पुरक राखी प्रदर्शन यां विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले पर्यवेक्षक अच्युतराव वणवे सरांनी प्रदर्शनातून कलेचा विकास कसा साधला जातो या विषयी मार्गदर्शन केले या उपक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .