*कोंकण एक्सप्रेस*
*मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण भाजपा पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय मालवण येथील कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्र राज्यात मत्स्यउत्पादन 47 टक्के वाढले. राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व मत्स्य विभाग सर्व अधिकारी कर्मचाऱ्याचे भाजपा मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी भाजपा मच्छिमार सेल जिल्हासंयोजक विकी तोरसकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा उपाध्यक्ष मनोज मेतर, मोहन वराडकर, पंकज सादये, युवामोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण, सुरेश बापार्डेकर यांसह अन्य उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभाग गतिमान झाला आहे. मच्छिमार हिताचे अनेक निर्णय झाले. परराज्यातील अनधिकृत मासेमारीवर धडक कारवाई होत आहे. रिक्त पदे भरणा होत आहेत. असे मोंडकर यांनी सांगितले.
आगामी काळात मच्छिमार परवाना नोंदणीसाठी किनारपट्टी गाव स्तरावर नोंदणी शिबीर, मच्छिमार योजना माहितीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु करणे. याबाबत बाबा मोंडकर यांनी चर्चा केली.