*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली येथे १० रोजी कबड्डी स्पर्धा*
*कणकवली : प्रतिनिधी*
भालचंद्र मित्रमंडळ, कणकवलीच्यावतीने रविवार १० आॅगस्टला विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये दहा हजार व चषक, द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी दीड हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूस एक हजार रुपये व चषक, उत्कृष्ट पकड सातशे रुपये व चषक, उत्कृष्ट चढाई सातशे रुपये व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. कबड्डीप्रेमींनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी दीपक देऊळकर ९४०४९०१५८५ व रूचिर ठाकूर ९५५२२२१२७६ यांच्याशी संपर्क साधायचा आहे.