इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून 600 फळझाडेरोप 300 महिलांना वितरित

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून 600 फळझाडेरोप 300 महिलांना वितरित

*कोंकण एक्सप्रेस*

*इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून 600 फळझाडेरोप 300 महिलांना वितरित*

*सौ रश्मी नाईक यांचे संपर्कातील चेंदवण ,कवठी मधील तब्बल 300 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*

*कुडाळ (प्रतिनिधी)*

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून चेंदवण कवठी गावातील 300 महिलांना 600 फळझाडेरोप वितरण कार्यक्रम श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे संपन्न झाला.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने,चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या सौ शिल्पा बिले,सौ ऋतुजा परब, सौ स्वप्नाली साळगावकर, सौ पदमा वेंगुर्लेकर, सौ सोनल आजगावकर, सौ राजश्री सावंत, चेंदवण पोलिसपाटील सौ शुभश्री शृंगारे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने,गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे,दिनेश आजगावकर, डाॅ संजय केसरे,शशिकांत चव्हाण, मुख्याध्यापक श्री माणिक पवार सर व शिक्षक वृंद,ग्रा.पं.सदस्या सौ विजयश्री मेस्त्री, चेंदवण स्त्री शक्ती ग्रामसंघ रश्मी नाईक,दिक्षा टुंबरे (CRP), सानवी चेंदवणकर, राजेशाही ग्राम संघ सायली नाईक,CRP रेवती तोरसकर ,समृद्धी ग्रामसंघ विजयश्री मेस्त्री ,CRP साक्षी नाईक,घे भरारी ग्रामसंघ कवठी – सेजल सदानंद बांदेकर, साक्षी जोशी, साक्षी मेस्त्री आदी उपस्थित होते .
रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर चा डोकोजू धन्यवाद उपक्रमांतर्गत 600 फळझाडे रोपांचे योगदान– सौ सानिका मदने
रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोरचा डोकोजू धन्यवाद उपक्रमांतर्गत 600 फळझाडेरोपांचे भरीव योगदान उपक्रम चेअरमन गजानन कांदळगावकर व राजन बोभाटे यांचे सहकार्यातून मिळाले आज इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ हा कार्यक्रम चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांचे पुढाकारातून यशस्वी करू शकला असे गौरवोद्गार इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केले.


भविष्यात रोटरी क्लब व इनरव्हील क्लब कडून चेंदवण गावात बायोगॅस प्रकल्प व्हावेत— माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक
भविष्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ माध्यमातून चेंदवण-कवठी गावातील शेतक-यांना बायोगॅस प्रकल्प उपलब्ध करून व्हावेत अशी अपेक्षा चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी 300 महिलांना 600 फळझाडेरोप वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.तसेच वितरित करण्यात आलेल्या 600 फळझाडेरोपे सर्व महिलांनी जगवायची आहेत त्यासाठी सहा महिन्यांनी उत्तम झाड जगवलेल्या महिलांचा विशेष बक्षिस देवून गौरविण्यात येणार असल्याचेही सौ रश्मी नाईक यांनी स्पष्ट केले.
600 वितरित करण्यात आलेल्या फळझाडेरोपांमध्ये सुपारी, लिंबू, दालचिनी, आदी झाडांचा समावेश होता.
सर्व उपस्थित महिलांच्या वतीने इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा सौ सानिका मदने, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार व डाॅ संजय केसरे यांचा विशेष सत्कार माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांचेहस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन व आभार सौ गवस व श्री धरणे सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!