बांदिवडे येथील अनधिकृत वाळूचे सात रॅम उध्वस्त..

बांदिवडे येथील अनधिकृत वाळूचे सात रॅम उध्वस्त..

*कोंकण एक्सप्रेस*

*बांदिवडे येथील अनधिकृत वाळूचे सात रॅम उध्वस्त..*

*मालवण दि प्रतिनिधी*

कालावल खाडी किनाऱ्यालगत बांदिवडे येथील सात वाळूचे अनधिकृत रॅम्प महसूल विभागाच्या टीमने गुरुवारी सायंकाळी उशिरा जे सी बी च्या साह्याने
पूर्णपणे उध्वस्त केल्याने येथील अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांना दणका बसला आहे. मालवणच्या प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी वर्गाने सदर कार्यवाही केली.
कालावल खाडीच्या बांदिवडे गावाच्या लगतच अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी सदर रॅम्प बनविण्यात आले होते. याबाबतची कल्पना महसूल विभागाला कळताच सदरची कार्यवाही तातडीने करण्यात आली. या कार्यवाही मध्ये प्रभारी तहसीलदार मालवण  श्रीमती प्रिया हर्णे,मंडल अधिकारी मसुरे डी व्ही शिंगरे, मंडळ अधिकारी श्रावण एस आर चव्हाण, मंडल अधिकारी पेंडूर अजय परब, मंडळ अधिकारी पोईप संतोष गुरखे, मंडळ अधिकारी कोळंब श्रीमती मीनल चव्हाण, मंडळ अधिकारी सुकळवाड एस एस जंगले, ग्राम महसूल अधिकारी देऊळवाडा संतोष जाधव, ग्राम महसूल अधिकारी बेलाचीवाडी श्री. भागवत, महसूल ग्रामसेवक मसुरे सचिन चव्हाण, महसूल ग्रामसेविका वर्षा रामाने, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यवाहीसाठी बंद अधिकारी आणि पोलीस प्रशासन मालवण यांचे सुद्धा सहकार्य लाभले. यापुढे सुद्धा या भागामध्ये जर अनधिकृत वाळूचा उपसा आणि अनधिकृत रॅम निदर्शनात आले तर ते सर्व महसूल विभागाच्या वतीने उध्वस्त केले जातील अशीही माहिती मसुरे मंडळ अधिकारी डीव्ही शिंगरे यांनी दिले. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे या परिसरामध्ये अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!