*कोंकण एक्सप्रेस*
*स्वातंत्र्यदिन निमित्त बाल शिवाजी इंग्लिश स्कूलच्या वतीने कणकवली तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन*
*कणकवली: प्रतिनिधी*
स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी कणकवली बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल वतीने तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. कणकवली व नाद संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता, बाल शिवाजी स्कूल कॅम्पस, जानवली येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धेमध्ये कणकवली तालुक्यातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग खुला असून, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सहभाग घेता येणार आहे. प्रत्येक गटात किमान ५ व कमाल १० विद्यार्थ्यांचा समावेश असावा, अशी अट आयोजकांनी घातली आहे. प्रत्येक गटाला ६ मिनिटे सादरीकरणाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा मूळ हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण करणे तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे. “देशप्रेमाचा जयघोष गाण्यातून व्यक्त करा!” असा या उपक्रमाचा संदेश आहे.
स्पर्धेत विजेत्या गटांना आकर्षक ट्रॉफीज, प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात येणार असून, सहभागी सर्व गटांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी 12 ऑगस्ट २०२५ सकाळी ९:३० वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 श्री. हेमंत तवटे – 8261930716
📞 सौ. प्रणाली सावंत – 9820725989