शिक्षणाची पद्धत बदला! AI सोबत भविष्य घडवा…..! कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण फोडाघाट येथे पार पडले

शिक्षणाची पद्धत बदला! AI सोबत भविष्य घडवा…..! कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण फोडाघाट येथे पार पडले

*कोंकण एक्सप्रेस*

*शिक्षणाची पद्धत बदला! AI सोबत भविष्य घडवा…..! कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण फोडाघाट येथे पार पडले*

*फोंडाघाट – प्रतिनिधी*

जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री रवींद्र खेबुडकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिबिर प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आले. याच शिबिराचा एक भाग म्हणून फोडाघाट प्रभागाचे प्रशिक्षण फोंडाघाट महाविद्यालय या ठिकाणी पार पडले. या शिबिरासाठी जवळजवळ 130 शिक्षक सहभागी झाले या शिबिराचे मार्गदर्शन रचना कम्प्युटर टेक्नॉलॉजी चे श्री. गणेश इस्वलकर व इन साईट कम्प्युटरचे श्री प्रशांत वांजुळे यांनी केले. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय? त्याचा इतिहास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे प्रकार, रोजच्या जीवनात होणारा (AI) वापर व फायदा याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर शिक्षकांना उपयोगी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्स उदा. RUNWAYML, CUTOUTPRO, ADOBE FIREFLY,GRAMMARLY, QUILLBOT,MAGICSCHOOL AI, CANVA FOR EDUCATION, PHOTOMATH अशा विविध टूलचा वापर कसा करावयाचा याविषयी माहिती देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शैक्षणिक क्षेत्रात कसा वापर करून घेता येईल याच प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
फोंडाघाट महाविद्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फोंडाघाट, डामरे – तिवरे, घोणसरी, हरकुळ खुर्द, पियाळी या प्रभागाच्या वतीने केंद्रप्रमुख श्री सुभाष महाले यांनी या उपक्रमामुळे शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात भरपूर फायदा होईल. असं यावेळी आपलं मनोगत व्यक्त केल. कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद पारकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणासाठी सौ. गायत्री इस्वलकर, कुमारी धनश्री बागवे, ओंकार मेस्त्री व नेहा आरेकर यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी श्री व सौ. होळकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण विषयी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री नितीन पाटील सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!