*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर प्राथमिक विभाग पालक – शिक्षक स्नेहमेळावा*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर प्राथमिक विभाग या प्रशालेत इयत्ता पहिली ते चौथी या मराठी माध्यम प्रशालेतील पालकांचा शिक्षकांसमवेत स्नेह मेळावा संपन्न झाला . या स्नेह मेळाव्याला अध्यक्ष म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याधापक श्री पी जे कांबळे सर यांनी भूळविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर होते . प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम यांनी पाहुण्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्राथमिक विभागातील कामकाजाचा प्रास्ताविकात आढावा घेतला . प्रमुख मार्गदर्शक श्री वणवे सरांनी विद्यामंदिर प्राथमिक विभागातील शिस्त आणि विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांची भूमिका किती महत्वाची असते या विषयी मार्गदर्शन केले तसेच प्राथमिक शिक्षणात पालकांचे सहकार्य मोलाचे असते जर पालकांनी बदलत्या काळातील शिक्षण व्यवस्थेला सढळ हाताने मदत केली तरच शिक्षण विविध अंगाने बहरेल असे मत व्यक्त केले पालकांमधून ही शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला विद्यार्थी ‘ शिक्षक ‘पालक यांचा त्रिवेणी संगम शिक्षणाच्या विकासात महत्वाचे सूत्र मानले जाते याच सूचांचा प्रत्यय या स्नेह मेळण्यात दिसून आला अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी मूल घडविण्यासाठी पालकांची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले तसेच नविन अभ्यासक्रम आणि प्राथमिक विभागात राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम हे विद्यार्थांचे पायाभूत शिक्षण विकासासाठी कसे महत्वाचे आहेत यांचा आढावा घेऊन पालकांच्या मधून विविध शैक्षणिक समित्यांची स्थापना करण्यात आल्या . सौ खुडकर मॅडम यांनी सुंदर निवेदन केले यावेळी प्राथमिक विभागातील सौ लोकरे मॅडम श्री हरकुळकर सर उपस्थित होते आभार सौ नौकुडकर मॅडम यांनी मानले या स्नेह मेळाव्याला पालक बहूसंख्येने उपस्थित होते .