*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल ओसरगांव – बोर्डवे येथे शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने मोफत वृक्षवाटप कार्यक्रम*
*ओसरगांव : प्रतिनिधी*
मंगळवार दि.5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बँगलोर येथील उद्योगपती श्री. रविशंकर डाकोजू यांच्या सहकार्यातून रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल व सिंधुदुर्ग रोटरी परिवार च्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल ओसरगांव – बोर्डवे येथे हायस्कूल मधील बोर्डवे गावातील विद्यार्थ्यांचे पालक व शेतकरी यांना नारळ,आंबा,काजू, सुपारी,चिकू, इत्यादी फळझाडांचे मोफत वाटप करण्यात आले , प्रत्येक शेतकऱ्यांना किमान 2 रोपे/कलमे देण्यात आली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष – श्री.अरुण मालणकर, सेक्रेटरी – श्री.दीपक आळवे, शाळा समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री.चंद्रहास उर्फ बबली राणे,बोर्डवे गावचे उपसरपंच श्री. मोडक, मुख्याध्यापक श्री. मर्ढे सर , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, बोर्डवे गावचे शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री. मर्ढे सर यांनी केले.रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे सेक्रेटरी रो.दीपक आळवे सर यांनी आपल्या मनोगतात ही फळझाडे बँगलोर येथील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते श्री.रविशंकर डोकोजू यांच्या फाऊंडेशन तर्फे मिळाली असून ” धन्यवाद डोकोजु ” अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्री. रविशंकर डोकोजू यांनी गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून दरवर्षी आपल्या जिल्ह्यात दहा हजार वृक्ष लागवड करण्यात येते .या साठी कुडाळ रोटरी क्लबचे सहकार्य मिळते असे सांगून रोटरी क्लबचे कार्य ,वृक्षलागवडीचे महत्व विषद करून शेतकऱ्यांनी आपल्या साठी आवश्यक मोफत वृक्ष/ रोपे घेऊन त्याची लागवड व संगोपन करून पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.
श्री.बबली राणे यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबने आपल्या गावात श्री. रविशंकर डोकोजू यांच्या सहकार्यातून वृक्ष वाटप केले याबाबत रोटरी परिवार व श्री. रविशंकर डोकोजू यांना गावच्या वतीने धन्यवाद दिले व वृक्ष लागवडीचे महत्त्व व वृक्ष लागवड संबंधित आपले बालपणीचे अनुभव कथन केले.
रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री.अरुण मालणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित शेतकरी व श्री. रविशंकर डोकोजू यांचे आभार मानले.
यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले व शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.