स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा -गजानन कांदळगावकर

स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा -गजानन कांदळगावकर

*कोंकण एक्सप्रेस*

*स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करून वाटचाल करा -गजानन कांदळगावकर*

*दैवज्ञ समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा*

*कुडाळ – प्रतिनिधी*

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना स्पर्धा वाढली आहे. यश सहज सोपे नाही. आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) आपण कितीही नाकारले तरी आपल्याला त्याला सामोरे जावे लागणार आहे. तुम्ही ध्येय निश्चित करा पुढे जाण्याची क्षमता आपल्या समाजातील मुलांमध्ये आहे. आताच करिअर निवडा. भविष्यात आपल्या समाजातील मुले आनंदी जीवन जगताना व्यवसायिक बनण्याकडे त्यांचा कल असला पाहिजे असे प्रतिपादन दैवज्ञ समाजाचे

युवा उद्योजक गजानन कांदळगावकर यांनी केले. दैवज्ञ समाजाच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

दैवज्ञ ब्राह्मण समाज कुडाळ आणि दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे थोर राष्ट्रपुरुष जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दैवज्ञ भवन कुडाळ येथे रविवारी सायंकाळी मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाच्या डॉ श्रद्धा मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक गजानन कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, माजी कुडाळ तालुका अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आनंद मालवणकर, दैवज्ञ समाज कुडाळ अध्यक्ष राजू पाटणकर, महिला अध्यक्ष कनक पाटणकर, कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अनंत जामसंडेकर, ग्राम महसूल अधिकारी समीक्षा सोनवडेकर, जयराम डिगसकर, तसेच प्रतिभा पाटणकर, स्नेहल कुडाळकर, अनुराधा कांदळगावकर, राहुल पाटणकर, भाऊ पाटणकर, डॉ विवेक पाटणकर, श्रीमती श्रद्धा पाटणकर, महेश ओटवणेकर, अवधूत ओटवणेकर, मानसी ओटवणेकर, निनाद हीर्लेकर नितीन हीर्लेकर, विनोद कडोलकर, गीतांजली कांदळगावकर, मनोज मठकर अमेय पेडणेकर, नागेश कुडाळकर, समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी विद्यार्थी पालक महिलावर्ग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काका कुडाळकर म्हणाले, थोर राष्ट्रपुरुष नाना शंकरशेट यांचे कार्य तेवत ठेवण्याचे काम आपण करत आहोत. आपल्या समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना प्रत्येकाने समजावून त्याचा लाभ कसा घेता येतो, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा सर्व लाभ घेण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे. संत नरहरी सोनार आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून जे काही लाभ आहेत ते लाभ आपल्या समाजातील मुलांनी घेतले पाहिजेत. प्रशासकीय सेवेत उतरले पाहिजे, असे सांगितले.

डॉ मालवणकर म्हणाल्या, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना कोणत्या क्षेत्रात आपल्याला पाऊल टाकायचे आहे ते आताच ठरवले पाहिजे. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले यश पाहता आपल्याला मिळालेल्या योग्य संधीचा वापर करून त्या संधीचं सोनं करा. आपल्या बरोबर समाजही पुढे गेला पाहिजे. समीक्षा सोनवडेकर म्हणाल्या, आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी झाले पाहिजे. आपली मुले अन्य क्षेत्रात जातात. स्पर्धा परीक्षाकडे जाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. हे साध्य करण्यासाठी पाच सहा वर्षे मेहनत करावीच लागणार असे सांगत स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात महिला मंडळ अध्यक्ष कनक पाटणकर यांनी नाना शंकर शेठ यांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. सूत्रसंचालन महेश ओटवणेकर यांनी केले.

गुणवंत गौरव सोहळा

विशेष प्राविण्य : वेदिका कारेकर कथक नृत्य नृत्य ए ग्रेड, नील कांदळगावकर गणित प्रज्ञा परीक्षा व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, अन्वी कांदळगावकर एसटीएस परीक्षा सुवर्णपदक आणि एपीजे अब्दुल कलाम परीक्षा, लावण्या पेडणेकर कथक नृत्य, मित वालावलकर पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, आयुष कारेकर आठवी शिष्यवृत्ती परीक्षा श्लोक वेदक ब्रेन डेव्हलपमेंट, सृष्टी कुडाळकर डॉक्टर फार्मसी ऑफ फार्मासिटी, सुमेध मालवणकर जिल्हा विज्ञान प्रदर्शन यश, समीक्षा सोनवडेकर ग्राम महसूल अधिकारी, दहावी परीक्षा स्मितेश कटोलकर 99.40%, रिया पाटणकर 99%, हेमांग कुबल 90.40%, बारावी कार्तिकेयन मडगावकर, अर्पिता ओटवणेकर, शर्वरी कारेकर, पदवी इशा खेडेकर बीए, नक्षत्रा मालवणकर एमबीए, अथर्व नागवेकर बी एम एस या गुणवंतांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!