*कोंकण एक्सप्रेस*
*सुखशांती मंडळाचा दीपस्तंभवत उपक्रम : सत्यवान भोगले*
*साळशी हायस्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव*
*सुखशांती मंडळाचा स्तुप्त उपक्रम*
*शिरगाव : संतोष साळसकर*
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक आत्मीयतेने केला जातो साळशी-सरमळेवाडी सारखी एक छोटिशी वाडी विद्यार्थ्याच्या यशाची दखल घेऊन त्याच्या गौरवासाठी पुढे सरसावते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या मंडळाचे कार्य दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असून, त्यांचा एकोपा असाच कायम टिकून राहावा, असे मत साळशी हायस्कूलचे स्कूल कमिटीचे चेअरमन सत्यवान भोगले यांनी साळशी येथे व्यक्त केले.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळातर्फे भेटवस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांमध्ये केतकी रवींद्र साळसकर (९१.२०%) हिने प्रथम क्रमांक मिळवला. मंदार संतोष साळसकर व सोहम सुरेश नाईक (९०%) यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावला, तर दिव्या कैलास गावकर (८८.६०%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. सलग सात वर्षे या शाळेचा १००% निकाल लागल्याने शिक्षकवर्गाचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना साळशी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सत्यवान सावंत यानी ‘सुखशांती’ या नावातच समाधान, सलोखा आणि सेवा या मूल्यांचा अंतर्भाव आहे. जि.प. प्राथमिक शाळा सरमळेवाडीच्या स्थापनेतही या मंडळाचा मोलाचा वाटा आहे. असे मत व्यक्त केले. या मंडळाचे अध्यक्ष अमित रावले यांनी गेली अकरा वर्षे आमचे मंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहे. या उपक्रमाचे फलित म्हणजे गेली सात वर्षे शाळेचा निकाल सातत्याने १००% लागत आहे आणि यातच आमचे खरे समाधान आहे. असे मत व्यक्त केले
सचिव राजेंद्र साटम यांनी आपल्या प्रस्तावनेत मंडळाच्या कार्याची माहिती दिली. समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उद्देशाने सुखशांती मंडळ हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.
या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष सत्यवान सावंत, चेअरमन सत्यवान भोगले, मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष अमित रावले, सचिव राजेंद्र साटम, विठोबा रावले, सुरेश कदम, शांताराम रावले, अनंत पवार, रवींद्र साळसकर, संतोष साळसकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वप्निल भरणकर यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातूनच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांतून नवचैतन्य, प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते.
मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी “सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले असून, मंडळाच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.