*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी*
*कणकवली – प्रतिनिधी*
शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली कॉलेज कणकवली येथे सांस्कृतिक विभाग व आय.क्यू.ए.सी.विभागातर्फे आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ.प्रा.राजेंद्र मुंबरकर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.विजयकुमार सावंत,प्रा.सुषमा हरकुळकर, ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.महादेव माने , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर, ज्युनिअर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.विजय सावंत हे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार आत्मसात करा असे सांगितले.दैनदिन आयुष्य जगत असताना सभोवताली घटलेल्या घटनांचा आपल्यावर परिणाम होतो त्यातून आपण घडत असतो त्यामुळे विद्यार्थी मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन शिक्षण व अनुभव यांची कास धरावी असे सांगितले.तर या कार्यक्रमाचे अतिथी प्रा.विजयकुमार सावंत यांनी लोकमान्य टिळक यांच्या समग्र जीवनपट उलगडून दाखवला विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे जीवन विचार समजून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचले पाहिजे असे सांगितले.त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसणारे मूल्य विचार त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन पटवून दिले.तर प्रा.सुषमा हरकुळकर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवन प्रवास विशद केला.त्यांचे साहित्य हे माणूस घडविणारे आहे.त्यांच्या साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याने वाचले पाहिजे असे सांगितले.तसेच ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.महादेव माने यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले.दिक्षिता लाड हीने लोकमान्य टिळक यांच्या विचारांवर उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सीमा हडकर यांनी केले.तर सूत्रसंचालन कु.चंदना परब हिने केले.वआभार प्रदर्शन कु.माही पटेल हिने मानले.या कार्यक्रमास सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.