*कोंकण एक्सप्रेस*
*एस. एम.हायस्कूलमध्ये लोकमान्य. टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
एस.एम. हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनांक 01ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली प्रशालेचे उपमुख्याध्यापक मा. श्री.प्रधान सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली यानंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विध्यार्थांची दोन गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेली होती या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी मनस्वी आरोलकर,दर्शना जाधव,हर्ष शिवापुरकर, पद्मज महाडिक,चारुता तिरोडकर, स्नेहा गीते, काजल जाधव, मनाली कदम,या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना उपप्राचार्य माननीय. श्री. प्रधान सर यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन उत्तम गुणांची जोपासना करा असे उद्बोधक विचार मांडले.
प्रशालेचे शिक्षक श्री.केंद्र सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गावित मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. श्री. संदीप सावंत सर उपकार्याध्यक्ष डॉ. तायशेटे साहेब श्री.काणेकर साहेब सचिव श्री. डी. एम. नलावडे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जी.एन बोडके सर पर्यवेक्षक श्री. जी. एक कदम सर यांनी शुभेच्छा दिल्या.