*ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षात आपले स्थान काय याची उत्तम लोके यांनी पडताळणी करावी*

*ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षात आपले स्थान काय याची उत्तम लोके यांनी पडताळणी करावी*

*कोंकण एक्स्प्रेस*

*ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षात आपले स्थान काय याची उत्तम लोके यांनी पडताळणी करावी*

*जेव्हा प्रसंग येतात तेव्हा नाईक कुटुंबीय कुठे असतात*

*स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी निष्ठावान म्हणून घेणाऱ्यांना आमच्या नेत्यांवर व पदाधिकाऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही*

*भाजपा युवमोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी घेतला उत्तम लोकेंच्या वक्तव्याचा समाचार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांच्या नाम. नितेश राणे हे पसंतीस पडलेले पालकमंत्री आहेत. युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांच काम उत्तम लोके यांच्या सारख्या दिखाऊ निष्ठावानांना कळणार नाही. त्यामुळे उत्तम लोके यांनी आपण ज्या पक्षात आहोत तिथे आपले नेमके स्थान काय आहे हे पाहाव. उत्तम लोके यांच्यावर जेव्हा जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा नाईक नाईक कुटुंबीय का धावून आले नाहीत याचाही विचार उत्तम लोके यांनी करणे गरजेचे आहे. नाईक यांनी उबाठा शिवसेना ही गुंडांची शिवसेना असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र त्यांना त्याच पक्षात प्रवेश करावा लागला, असे प्रत्युत्तर युवामोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे. उबाठा चे उत्तम लोके यांनी केलेल्या टीकेचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

कालांतराने त्यांचाच भाऊ सुशांत नाईक हे विधानसभेला इच्छुक असताना वैभव नाईक यांनी पक्ष वरिष्ठाना बोलून सुशांत नाईक यांना विधानसभेच्या तिकीटपासून बाजूला केले. त्यामुळे नाईक यांनी तरी निष्ठेच्या गोष्टी बोलू नये. सुशांत नाईक यांनी रागाने बैभव नाईक यांच्या विरोधात षडयंत्र रचून वैभव नाईक यांना घरात बसवले हे जगजाहीर झालेला आहे. उत्तम लोके यांना रेस्ट हाऊस येथे मारहाण झाली. कणकवली व कनेडी, फोंडा येथे मारहाण झाली. तेव्हा नाईक प्रसंगाला का धावले नाहीत, याच उत्तर उत्तम लोके यांनी जाहीरपणे सांगावं. तसेच त्यांनी अगोदर स्वतःच्या बुडाखालील अंधार पहावा0आणि बेताल वक्तव्य करताना शंभर वेळा विचार करावा.

आपण अनेक लोकांचे देणेकरी आहात. स्वतःच्या कार्यालयात लोकांनी येऊन आपणास चांगला प्रसादही दिलेला आहे. तसेच आपण ठक सैनिक म्हणून प्रसिद्ध आहात. अनेक बँकांचे चेक बाउंस किती झाले ते मोजायला माणस नेमावी लागतील. तशी यादी देखील प्रसिद्ध करण्याची वेळ आणू नकात. विरार पूर्व नायगाव चंद्रपाडा येथे आपण ८ दिवस तरी पुनः जाऊन दाखवाल का? दुसऱ्या च्या घरांच्या पाट्या लावताना तुमचे उधारी चे, बोर्ड लागणार नाही याची काळजी घ्या.

स्वतःच्या स्वार्थासाठी निष्ठा दाखवून मागून मागून पद मिळवला आहात ते त्याच पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा उरलेली सुरलेली तुमच्या निष्ठेची प्रकरणे आम्हाला बाहेर काढावी लागतील. त्यामुळे पुनः टीका करण्याचा प्रयत्न जरी केलात तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही युवमोर्चा तालुकाध्यक्ष श्री. दळवी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!