माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २ ऑगस्ट रोजी रानभाज्या व पाककला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २ ऑगस्ट रोजी रानभाज्या व पाककला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन

*कोंकण एक्स्प्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे २ ऑगस्ट रोजी रानभाज्या व पाककला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन*

*कनेडी वार्ताहर*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी रानभाज्या व पाककला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.*

*पावसाळ्यात कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. अगदी माळरानावर, शेताच्या कडेने, घराच्या बाजूला विविध रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात सहज उपलब्ध होतात. यात अळू, पेवगा, टाकळा, फोडशी, घोटवेल, एक पानाजी भाजी, शेवगा, करटोली, कुर्डू, कुड्याच्या शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरात सापडतात. परंतु फास्ट फूडच्या जमान्यात नवीपिढी या नैसर्गिक रानभाज्यांना विसरत आहेत. या रानभाज्यांने आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्व आहे. विद्यार्थ्यांना या रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाज्यांपासून चविष्ठ पदार्थ तयार केले जाऊ शकतात तसेच मुलांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व समजावे, या उद्देशाने प्रशालेमार्फत रानभाज्या व पाककला स्पर्धा प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन प्रशालेमार्फत गौरव केला जाणार आहे.*

*सदर रानभाजी व पाककला स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी तसेच पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना केले आहे, हे प्रदर्शन वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजनबद्ध वातावरणात “ज्ञानदीप सांस्कृतिक भवन” येथे संपन्न होणार आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!